दैनिक चालु वार्ता, शहादा
प्रतिनिधी : क्रिष्णा गोणे
शिंदखेडा : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात बरेच प्रमाणात आदिवासी वस्ती आहेत. आदिवासींचा सोयीसुविधा मात्र अपुर्णच.
शिंदखेडा तालुक्यात ४० पेक्षा जास्त खेडी व आदिवासी वस्त्या आहेत पण उपचारांसाठी रूग्णालयाची सुविधेचा आजही अभाव च
शिंदखेडा तालुक्यात शासकीय रूग्णालयात अशीच एक अवस्था आहे. रात्री बे रात्री गरजू रूग्ण उपचारांसाठी आशेने जातात मात्र तिथे सुविधेचा अभाव व रूग्णवाहिका उपलब्ध असुन सुद्धा चालकांची गैरहजेरी,डाॅक्टरांची अफरातफरी उपचार करून रूग्णाला जिल्हा स्थळी घेऊन जा असे वक्तव्य करून गरजूंना रूग्णालयात जाण्यासाठी रुग्णवहिका असुन चालकांची गैरहजेरी सात नोव्हेंबर रोजी रात्री गर्भवती महिलेला रक्तस्त्राव होत असुन दोन ते तीन तास त्याच रूग्णांलयात होती.अखेर जिल्हा स्थळी घेऊन जा असं वक्तव्य केले पण त्या स्थळी घेऊन जाण्यासाठी खाजगी कुठलेही साधन नसुन शासकीय रूगवहिकांची मागणी केली असता चालक उपलब्ध नसतात असे उत्तर मिळतात.
म्हणून भिल समाज विकास मंच शिंदखेडा यांनी तालुक्यातील तहसिलदार साहेब यांच्या कडे निवेदन देऊन निवेदनात असे म्हटले कि, गोरगरिबांसाठी आरोग्य सुविधा मजबूत करावी.
रात्री बे रात्री तात्काळ उपचार व्हावे.
नाहीतर भिल समाज विकास मंच शिंदखेडा कडून आंदोलन सुरू राहील असे
१)दिपक भाऊ अहिरे (नगरसेवक)
२) बापुजी फुले.
३)शाम मालचे
४) अमरसिंग पाडवी
आदी कार्यकर्ते उपस्थित असुन
यांनी
निवेदनाव्दारे म्हटले आहे.