
दैनिक चालू वार्ता
रायगड /म्हसळा प्रतिनिधी प्रा. अंगद कांबळे
तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानमोडी शाळेचे मुख्याध्यापक विक्रम बलभीमराव पाचंगे यांच्या “भारतीय पंतप्रधान “या पुस्तकाचे प्रकाशन सिंहगड इन्स्टिट्यूट कुसगाव लोणावळा येथे स्टेट इनोवेशन अँड रिसर्च फाउंडेशन द्वारा आयोजित नॅशनल लेव्हल एज्युकेशन इनोव्हेशन कॉन्फरन्स 2021 यामध्ये राज्याचे साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड सर आय. ए .एस ,डॉक्टर अरविंद नातू ज्येष्ठ शास्त्रज्ञ ,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या माजी अध्यक्ष शकुंतला काळे मॅडम ,एस सी आर टी पुणे आयटी विभाग संचालक माननीय विकास गरड साहेब वाबळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्रीदत्तात्रेय वारे गुरुजी ,श्री चेतन भाई पटेल आय आय एम अहमदाबाद ,सर फाउंडेशन चे राज्य समन्वयक श्री सिद्धाराम माशाळे सर ,श्री बाळासाहेब वाघ सर ,सो हेमा शिंदे वाघ मॅडम, माननीय राजकिरण चव्हाण सर ,सौ अनघा कुलकर्णी , विस्तार अधिकारी मल्हारी माने साहेब,उस्मानाबाद जिल्हा समन्वयक श्री गुणवंत चव्हाण, सो मंजुषा स्वामी, सौ रंजना स्वामी डॉ. विलास साळुंखे नवोपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि मानमोडी शाळेचे मुख्याध्यापक उपक्रमशील शिक्षक विक्रम पाचंगे यांच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यामुळे शालेय व्यवस्थापन समिती मानमोडी, विस्तार अधिकारी श्री सर्जे.जी.एन,केंद्रप्रमुख अंगुले अरुण आदींनी कौतुक केले.