
दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
मंगळवार दि. ०९/११/२०२१ रोजी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या संस्थापक कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की पालघर जिल्ह्या
मधील सर्वच तालुका कमिट्या बरखास्त करण्यात येत आहेत.
जानेवारी २०२२ मध्ये पालघर जिल्हातील सर्वच तालुक्यामध्ये नविन कमिट्या बनविण्यात येतील. संघटना वाढीसाठी महत्वाचा निर्णय संस्थापक कमिटीने घेतला आहे असे संघटनेचे अध्यक्ष मा.श्री. अनंता वनगा साहेब यांनी सांगितले. २०१३ मध्ये पालघर जिल्हामधील आदिवासी तरुण एकत्रित येऊन
आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना स्थापन करुन आदिवासी समाजा साठी हक्काचे व्यास पिठ तयार केले.
संघटने मार्फत आज पर्यत बरेचसे विषय हाताळले आहेत , संघटने मार्फत सामाजिक क्षेत्रात समाजासाठी भरपुर कामे केली आहेत , विविध प्रश्न व समस्यां बाबत संघटना सर्व सामान्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी असते.
पालघर जिल्हामध्ये आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय – अत्याचारा विराेधात आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटने मार्फत नेहमीच आवाज उठवला जातो.
जे कार्यकर्ते संघटने सोबत निष्ठेने आहेत त्यांना संघटनेमध्ये महत्वाची जबाबदारी देण्यात येईल असे संस्थापक कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे.
नविन कमिट्यांमध्ये निविन चेहरे घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे संघटना वाढीस याचा नक्कीच फायदा होईल.
जिल्हातील आदिवासी समाजातील तरुण / तरुणींना समाजासाठी काम करण्याची आवड असेल अशा तरुण/ तरुणींना नविन कमिट्यांमध्ये संधी देण्यात येईल.
श्री. अरुण शंकर खुलात अध्यक्ष पालघर जिल्हा कमिटी.आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना यांनी माहिती दिली.