
दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
भारताचे पहिले शिक्षण मंत्री डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून 2008 पासून मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केल्यापासून साजरा करण्यात येतो.
*या दिनाचे औचित्य साधून 11 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा,केंद्र कोशिंबी,ता.भिवंडी येथे डाॅ.मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिन आयोजित करण्यात आला*
प्रथम डाॅ.मौलाना अबुल कलाम आझाद यांचे प्रतिमेला शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मोरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
*सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी डाॅ.मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवन कार्य व शिक्षण मंत्री असताना केलेले भरीव शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकत शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थांना पटवून दिले*
उपस्थित सर्व विद्यार्थांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मोरे,मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी खाऊ वाटप करून आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.