
दैनिक चालू वार्ता
पन्हाळा प्रतिनिधी शहाबाज मुजावर
पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद पन्हाळा ला सलग चार वेळस देश पातळीवर पुरस्कार व थ्री स्टार मानांकित प्राप्त मुळे दिल्लीत राष्ट्रपती यांच्या हस्ते 20 नोव्हेंबरला 2021 सत्कार
पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद 1954 ला खास गिरिस्थान म्हणून नगर परिषद स्थापन झाले आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा महत्त्वाचा किल्ला अशी ओळख महाराष्ट्रात आहे,
स्वच्छ सर्वेक्षण २०१९- २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये ६ व देशपातळीवर १७ वा
आला होता, स्वच्छ सर्वेक्षण २०२०- देश पातळीवर ५ वा आणि २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये १ ला.
२०२१ मध्ये यावर्षी स्वच्छ भारत मिशनच्या जॉईट सेक्रेटरी रुपा मिश्रा यांनी नुकतीच काही शहराची यादी जाहिर केली आहे . त्याच पन्हाळगडाचा नंबर आलेला आहे त्यामुळे त्या सत्कारासाठी रूपा मिश्रा यांचे पन्हाळा नगरपरिषद ला पत्र आले आहे विज्ञान भवन येथे २० नोव्हेंबर ला राष्ट्रपती च्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे .देशातील शहरं स्वच्छ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून चार वर्षापुर्वी देशात स्वच्छतेची चळवळ सुरु झाली . चार वर्षापुर्वी पन्हाळगडाची ओळख ही कचरामुक्त हागणदारी मुक्त प्लास्टिक मुक्त नगरपरिषद अशी झाली आहे . तसेच चार वर्षांपूर्वी पन्हाळा नगरपरिषदेने गांडूळखत कचऱ्यापासून तयार करणारा प्रकल्प तयार केला ,पन्हाळगडावर प्लास्टिक बंदी चांगल्या प्रकारे राबवली होती आहे ,तसेच यावर्षी सांडपाणी प्रक्रिया केंद्र प्रस्तावित आहे, त्याची तयारी सुरू आहे,
या करिता परिश्रम उपनगराध्यक्षा पल्लवी नायकवडी, नगरसेविका सुरेखा भोसले, श्रीमती रुकसाना मुजावर ,माधवी भोसले, सुरेखा गोसावी ,नगरसेवक, फिरोज मुजावर, रविंद्र तोरसे, चेतन्य भोसले, पन्हाळा नगरपरिषद चे विरोधी पक्षनेते आसिफ मोकाशी सामाजिक कार्यकर्ते तय्यब शेठ मुजावर,, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र घडेल, राहुल भोसले, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, जीवन पाटील,राजू नगारजी, राजू आगा, संग्रामसिंह भोसले, ज्येष्ठ नागरिक सुभाष गवळी मारुती माने, मुख्याधिकारी, स्वरूप खारगे मुकादम जयवंत कांबळे ,अमित माने ,आनंदा रेडेकर सुभाष पवार ,माधुरी गवळी तसेच प्रवासी कर नाक्यावर पर्यटकांचा प्लॅस्टिक काढून नगरपालिकेत स्टाप घेत होते त्यात सुहास भोसले ,गणेश भोसले संजय रणभीसे ,दीपक कासे ,अरुण कांबळे ,या सर्व नगरपालिकेचा करमचारीवर्ग तसेच पन्हाळा चे सर्व रहिवासी व्यवसायिक व पर्यटन यांच्यामुळेच नंबर येणे शक्य झालेला आहे तसेच नंबर अजून घोषित नाही दिल्लीत नंबर घोषित होणार आहेत संपूर्ण देशातले लक्ष 20 नोव्हेंबर ला दिल्लीत राहणार आहे तसेच माननीय आमदार विनयरावजी कोरे यांच्या संकल्पनेतून स्वच्छता मोहीम उभारण्यात आली होती यां सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे असे नगराध्यक्ष रुपाली रवींद्र धडेल यांनी दैनिक चालू वार्ता ला माहिती देताना सांगितले