
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : आता बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे.ती दिग्दर्शिका जोया अख्तरच्या चित्रपटातून पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बॉलिवूड कलाकारांसोबतच त्यांची मुले कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. हे स्टार किड्स बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.
जोया अख्तर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने तिचा आगामी चित्रपट ‘द आर्चीज’ची नुकतीच घोषणा केली आहे. हा चित्रपट आर्ची कॉमिक्सवर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदा आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
द आर्चीज’ या चित्रपटाच्या निमित्ताने जोया अख्तर आणि रीमा कागती पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात चार मित्रांचा लव्ह ट्रँगल दाखवण्यात येणार आहे. हा एक म्युजिक ड्रामा आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
जोयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आर्ची कॉमिक्सचे काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या स्क्रीनशॉटमध्ये चित्रपट नेटफ्सिवर प्रदर्शित होणार असल्याचे आहे. त्यामुळे तरुणांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. पण चित्रपटात कोणते स्टारकिड्स दिसणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.