
दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय विराट कोहलीला एकदिवस संघाच्या कर्णधारपदावरुनही हटवण्याची शक्यता आहे.विराट कोहलीवर कर्णधारपदाची जबाबदारी असल्याने त्याच्यावर दबाव असून त्याने पूर्वीच्या फॉर्मात यावं यासाठी बीसीसीआय हा निर्णय घेऊ शकतं. दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेनंतर एकदिवस संघाच्या नेतृत्वात बदल केले जाऊ शकतात. ११ जानेवारी २०२२ पासून ही मालिका सुरु होणार आहे. टी-२० प्रमाणे एकदिवसीय संघाचं नेतृत्वही रोहित शर्माकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे. तर के एल राहुलला उपकर्णधार केलं जाऊ शकतं.दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, न्यूझीलंडविरोधातील कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली विश्रांती घेऊ शकतो. २५ नोव्हेंबरला कानपूरमध्ये पहिला सामना खेळवला जाणार आहे. उप-कर्णधार अजिंक्य रहाणे यावेळी संघाचं नेतृत्व करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्माला दोन्ही कसोटी सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. दुसरा कसोटी सामना आणि दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिका यांच्यात जास्त अंतर नसल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे. टी-२० संघाचं कर्णधार रोहित शर्माकडे सोपवल्यानंतर बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी आता विराट कोहलीसोबत एकदिवसीय संघाच्या नेतृत्वासंबंधी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
रोहित शर्माकडे टी-२० संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं असून बीसीसीआयने न्यूझीलंडविरोधातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. १७ नोव्हेंबरला जयपूरमध्ये पहिला सामना खेळवला जाईल.