
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई शहरातील काही भागात मागील पंचवीस तीस वर्ष्यापूर्वी टाकलेली नळाची पाईपलाईन ही आजच्या घडीला एकदम नादुरुस्त झाली होती. याच कारणाने काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक ४ मांडवा डवरील भिम नगर परळी वेस भागात गरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. अश्या परिस्थितीमध्ये नागरिकांना अनेक प्रश्नांना
सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांची ही समस्या अंबाजोगाई नगर परिषदेचे प्र. नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी प्रभागातील जुन्या पाईपलाईनच्या
पाईपलाईनच्या ठिकाणी नवीन सहा इंची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ तेथील नागरिकांच्या उपस्थिती मध्ये केला. यावेळी प्रभागातील अनेक जेष्ठ नागरिक तथा युवक उपस्थित होते. पाईपलाईन बदलण्याचे काम पूर्ण होताच प्रभागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण बंद होणार आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिक विशेषतः महिलावर्ग राजकिशोर मोदी यांना धन्यवाद देत आहेत.