दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:
दि.२२ नोव्हेंबर.
आज तालुकास्तरीय भाषण स्पर्धेत
गोळवलकर गुरुजी विद्यालयातील इयत्ता सातवी वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु.वैष्णवी प्रकाशराव देवकत्ते हिने मोठ्या गटातून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमातून घेण्यात आलेले मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान या विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बीट भागातून द्वितीय क्रमांक मिळवल्यानंतर तालुकास्तरीय गटातही वैष्णवीने दुसरा क्रमांक मिळालेला आहे या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगांवकर, वर्गशिक्षिका स्मिता कुलकर्णी तसेच संस्थेचे पदाधिकारी व विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले.