दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी भंडारा- संभाजी गोसावी
राज्यांत सध्या शिंदे-फडवणीस सरकार सत्ताधारीत असल्यांमुळे अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या. काही जिल्ह्यांमध्ये शिंदे-फडवणीस यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना त्या त्या जिल्ह्यांत नियुक्ती मिळाली. गुरुवारी रात्री उशिरा सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यांत आल्या. यामध्ये भंडारा जिल्ह्यांचे तत्कालीन जिल्हाधिकारी संदीप कदम यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना २८ ऑक्टोंबर रोजी पदमुक्त करण्यात आले होते.त्यानंतर जिल्हाधिकारी पदाचा भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मून यांच्याकडे पदभार होता. त्यानंतर तो काढून गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याकडे पदभार सोपविण्यांत आला होता. गुरुवारी उशिरा झालेल्या बदलांमध्ये भंडारा जिल्ह्याला कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची भंडारा जिल्हाधिकारी पदी वर्णी लागली. योगेश कुंभेजकर हे सन २०१५ तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी चंद्रपूर तर नागपूर जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. योगेश कुंभेजकर भंडारा जिल्हाधिकारी पदाचा पदभार त्यांनी आज दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पदभार स्वीकारला.