दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर:- उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर बुद्रुक ता. लोहा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार नामदेव तारू यांच्या मातोश्री कै.श्रीमती गिरजाबाई ग्यानोबा तारू यांच्या ९ व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून दि. २४ नोव्हेंबर रोज गुरूवारी सकाळी दहा वाजता कै.उमाजीराव गोरे सार्वजनिक वाचनालय समोर संकल्प व वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन सौ.विमलबाई मन्नुसिंह ठाकुर ( सरपंच कलंबर) व माधव मोकले ( उपसरपंच) यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवराज महाराज हे राहणार आहेत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माधव दादा जमदाडे (अध्यक्ष रिपब्लिकन पक्ष ), शिवाभाऊ नरंगले (वंचित बहुजन आघाडी नांदेड ), उस्मान नगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघ ,पि.आय.रामराव गोधणे ,माधव पाटील घोरबांड,( मुख्य प्राण्याचे तज्ञ ) तर मार्गदर्शन मंगीलाल रामा राठोड,मनोहर चव्हाण,बंडू मदेवाड ,हे करणार आहेत.तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून मोहनराव सोर्गे ( मा.सरपंच ) विश्वनाथ पाटील भोकरे. ( पो.पाटील ) ,बळी पाटील भोकरे ( अध्यक्ष म.गां. तं.मुक्ती ) इंजिनियर बाबू कंकरे , डॉ.आर.जी.मुक्कनवार , डॉ.सुनिल गोरे , उत्तमराव कोंडलवाडे , बालाजी परदेशी ( मा.जि.प.सदस्य ) डि.के.कांबळे ( सामाजिक कार्यकर्ते ) मन्नुअप्पा मुक्कनवार ,बाबूअण्णा गोरे, यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कै.श्रीमती गिरजाबाई तारू यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त संकल्प व वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन 24 नोव्हेंबर रोज गुरुवारी या दिवशी आयोजन केले आहे .यावेळी नामवंत वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज देशमुख ( नेत्ररोग तज्ज्ञ ) डॉ.लक्ष्मीकांत बालाजी पेठकर ( आई क्लिनिक ,जनरल फिजिशीयन त्वचा,मुळव्याद , बालरोग तज्ज्ञ ) , डॉ.सौ.धनश्री लक्ष्मीकांत पेठकर ( आई क्लिनिक स्त्री रोगतज्ञ) हे वैद्यकीय अधिकारी रुग्णांची तपासणी करून योग्य असे मार्गदर्शन व चष्मे अल्प दरात देण्यात येणार असल्याचे कळविले आहे तरी परिसरातील या शिबिराच्या मोठ्या संख्येने रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान शामराव तारू, नामदेव तारू ,अनिल सोनसळे ,अरविंद कांबळे, प्रभाकर हनुमंते , नागनाथ कुरुंदे,राजीव सोनकांबळे ,दीपक जाधव ,सुरेश मोरे ,पिंठू मरमठ यांनी आव्हान केले आहे.