
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
पेठवडज :- कंधार तालुक्यातील पेठवडज सर्कल मधील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, माजी उपसरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच पेठवडज सर्कल मधील सर्व शेतकरी बांधवांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.महावितरणच्या अशा प्रकारच्या वागण्याला शेतकरी कंटाळले आहेत.सुचना न देता विज कनेक्शन तोडण्यात आले आहेत त्यामुळे रब्बी हंगामातील पिके करपून जात आहेत.राज्याचे उप मुख्यमंत्री तथा गॄह मंत्री श्री.फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की ,कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची लाईट कनेक्शन कट करू नका मेव्हणाले तरी महावितरण कंपनी शासनाचे ,प्रशासनाचे ऐकायला तयार नाही.मनमानी कारभार सुरू असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पेठवडज सर्कल मधील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी सर्वांनी महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने करून शेतकऱ्यांची लाईट जोडून देण्यासाठी निदर्शने करून महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.शासनाने व प्रशासनाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी मागणी केले आहे.