
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत देगलूर शहरातील गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयातील ८ विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे. शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत शहरातील गोळवलकर गुरुजी विद्यालयातील सेजल सरके, सृष्टी पंचडे, वैभवी केरले, आर्यन बाळासाहेब नागरगोजे, ओमकार यशवंत राजुरे, प्रणिता लक्ष्मण राजुरे, बजरंग हणमंत चिंतले, राधिका काशिनाथ स्वामी हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी ठरले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा. चंद्रकांतराव मुळे तसेच स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत रेखावार, कार्यवाह प्रकाश चिंतावार, शालेय समिती अध्यक्ष सौ. अटकळीकर, मुख्याध्यापक दमन देगांवकर तसेच सर्व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.