
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:भारतीय संविधान दिना निमित्त देगलूर येथील डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘आम्ही भारताचे लोक व आमची राज्यघटना’ या विषयावर डॉ. राजशेखर सोलापूरे (प्रसिद्ध व्याख्याते तथा लेखक लातूर) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष येथील सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. विनायक मुंडे हे आहेत. स्वागताध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार (माजी नगराध्यक्ष ) हे आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. जितेश अंतापूरकर, माजी आ. सुभाष साबणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माधवराव मिसाळे, लक्ष्मीकांत पद्मवार, बालाजी रोयलावार, एच. एच. खंडागळे, वंचित बहुजन आघाडीचे शिवा नरंगले, डॉ. शेख, अविनाश हसनाळकर, महेश पाटील, अय्युब सेठ अमोदी (उद्योजक) अंकुश देसाई, अविनाश नितमवार, थोंडीबा कांबळे मुफ्ती मोहम्मद अहेमद, चंद्रकांत ठाणेकर, मा. बा. नरंगलकर, कैलास येसगे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी एनोद्दीन वारसी व वेणुवृंद होटल यांचा देशभक्तीपर गीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित केल आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संविधान जागर समिती, विशाखा महिला मंडळ भारतीय बौद्ध महासभा ए. पी. जे. अब्दुल कलाम विचारमंच, मानवी हक्क अभियान वंचित बहुजन आघाडी व संयोजक
संजय कांबळे यांनी केले आहे.