
दैनिक चालू वार्ता अर्धापूर प्रतिनिधी- मन्मथ भुस्से
विहीरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याच्या शाश्वतीप्रमाणे अधिकचे उत्पन्न घेणे शक्य होते. उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन व या पाण्याचा न्याय्य वापर करता आला पाहिजे. कमी पाण्यावर जास्त उत्पन्न देणाऱ्या पिक पद्धतीवर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्त जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाअंतर्गत पूर्ण झालेल्या विहीरींपैकी प्रातिनिधीक स्वरुपात 75 विहीरींचे जलपुजन आज करण्यात आले. याअंतर्गंत नांदेड जिल्ह्यातील कासारखेडा येथील मनोज प्रल्हाद हिंगोले यांच्या विहिरीचे जलपुजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, कृषि विकास अधिकारी डॉ. टी.जी. चिमणशेट्टे, जिल्हा कृषि अधिकारी विघयो भाग्यश्री बबनराव भोसले, उप मुख्य कार्यकारी