दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
निळेगव्हाण :-: नायगाव(खै.) तालुक्यातील निळेगव्हाण येथील दत्त संस्थान मठाधिपती गुरु आनंदबन महाराज यांनी सरपंच ग्रामपंचायत कार्यालय निळेगव्हाण यांना एक गुंठा जमीन जल जीवन मिशन योजनेसाठी चाळीस लाख रुपये निधी सरकारतर्फे मिळाला असून एक गुंठा जागा देऊन आनंदबन महाराजांनी गावाला पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी म्हणून त्यांनी त्यांच्या शेतातील एक गुंठा जमीन देऊन संपूर्ण गावाचा पाण्याचा प्रश्न मिटविला आहे महाराजांचे मानावे तेवढे उपकार कमीच आहेत कारण सदरील योजनेचे काम करण्यासाठी गावात सार्वजनिक पाण्याची टाकी बांधकाम करण्यासाठी गावठाणात जागा उपलब्ध नव्हती. याविषयी महाराजांनी गावकऱ्यासोबत चर्चा करण्यात आली, बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे महाराजांनी गावाचे हित विचारात घेऊन त्यांना त्यांच्या मठ संस्थान निळेगव्हाण यांच्या मालकीची व ताब्यातील शेत नंबर ८७ मधील क्षेत्रफळ ०.१ एक गुंठा जमीन ग्रामपंचायत कार्यालय निळेगव्हाण यांना मोफत दान देण्यात आली यावेळी आनंदबन महाराज ,सरपंच साहेब, बालाजी प्रल्हाद जाधव, निळकंठ बालाजी जाधव उपस्थित होते.