दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर:शहरातील जुना पंप हाऊस मार्गावरील बापू मार्केट भागात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री गजानन महाराज मंदिर व दत्त मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
शहरात हे मंदिर व्हावे यासाठी पंधरा ते वीस जणांनी पुढाकार घेवून दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने श्री गजानन महाराज व दत्त मंदिराचे बांधकाम केले. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राध्द, मुख्य देवता पुजन, अग्नीस्थापना, जलधिवास व ग्रामदक्षिणा हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ वाजता हणमंत महाराज कंठाळीकर यांचे व्याख्यान होणार आहे.२९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता देवतापूजन, मुख्य देवता हवन, न्यास होम, जलधिवास हवन, पर्याय होम, मूर्तीस्थापना विधी व शयनाधिवास हे विधी संपन्न होणार आहेत. ११ वाजता डॉ. उदय कुमठेकर यांचे व्याख्यान तर सायंकाळी ६ वाजता हणमंत महाराज कंठाळीकर यांचे व्याख्यान होणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता देवतापूजन, ८.४५ वाजता ह. भ. प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या हस्तेआहे.
मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे तद्नंतर महापूजा व आरती होणार आहे. यानंतर नराशाम महाराज येवतीकर यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा होणार आहे. सकाळी ९.३० वाजता ह. भ. प चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे प्रवचन व नंतर महाप्रसाद वाटप होणार आहे. या सोहळ्याला शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला आहे.