
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा : दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा रायाची याञा यावर्षी मोठ्या उत्साहात व भव्य स्वरूपाची भरणार असुन माळेगावत यावर्षी यळकोट यळकोट जय मल्हारचा जय घोष मोठ्या उत्साहात पाहावयास मिळणार असल्याची माहिती माळेगावचे सरपंच हनुमंत रूस्तुमराव धुळगंडे यांनी दिली आहे .
दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव याञेचे जि. प. कडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. दि. २२ डिसेंबर रोजी अमविस्या असल्याने त्या दिवशी देवस्वारी निघेल. जवळपास पाच दिवस यात्रा चालणार आहे. या यात्रेच्या नियोजनावरही बैठकीत चर्चा झाली. यंदा भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती सरपंच हनुमंत रुस्तुमराव धुळगंडे यांनी दिली.