दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीज्योती महात्मा फुले,सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा वेळोवेळी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अंजनगाव सुर्जी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळ फासून व जोडेमारून निषेध करण्यात आला.
थोर महापुरुषांबद्दल अश्या बेताल वक्तव्य करणाऱ्याला राज्यपाल पदावरून पायउतार करायला पाहिजे.परंतु हे मिंदी भाजपा सरकार सुद्धा आपल्या खुर्चीच्या लालसेपोटी थोर पुरुषांचा अवमान करून सुद्धा राज्यपाल यांना पाठिंबा देत असल्याचे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला दिसत आहे.महाराष्ट्रात हे खपून घेतले जाणार नाही,आम्हाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर त्यांनी माफी तर मागावीच…परंतु त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा सुद्धा द्यावा आणि तुम्ही तो राजीनामा त्वरित द्यावा असे काँग्रेस कमिटी शहर पदाधिकारी आणि तालुका पदाधिकारी यांनी यावेळी म्हटले.राजीनामा घेतला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करतील.असा इशारा काँग्रेस कमिटीच्या वतीने यावेळी देण्यात आला.