
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी येथील दैनिक पुण्यनगरी चे प्रतिनिधी तथा पॉवर ऑफ मीडियाचे शहर अध्यक्ष यांना येथील कापूस गठान व्यवसायिक विवेक सुधाकर काकड यांनी जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी अंजनगाव पोलीस स्टेशनमध्ये दि.२३ नोव्हेंबर २०२२ ला तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत माहिती अशी की,कापूस गठान विक्री व्यवहार प्रकरणातील काकड यांच्याकडून थकीत असलेली लाखो रुपयाची रक्कम परत मिळण्याकरिता आंध्रप्रदेश मधील एका कुटुंबाने येथील व्यापारी विवेक सुधाकर काकड यांच्या घरासमोर गेल्या पंचवीस दिवसापासून चक्क ठिय्या मांडला असल्याने या प्रकरणाची गावभर चर्चा सुरू झाल्याने स्थानिक पत्रकारांनी या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता काकड यांच्या घरासमोर आंध्र प्रदेश मधील दिवस रात्र ठिय्या मांडून बसलेल्या एका जोडप्याची हकीगत जाणून घेण्याकरिता पत्रकार गेले होते.याबाबतची माहिती कापूस व्यापारी विवेक काकड यांना मिळताच त्यांनी येथील दैनिक पुण्यनगरी चे तालुका प्रतीनीधी प्रवीण बोके ८२३७४२५५६० यांना या मोबाईल क्रमांकावरून कॉल करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन स्थानिक पत्रकारांना शिवीगाळ केली.विवेक काकड यांच्या प्रतापाची माहिती येथील पत्रकारांना मिळताच सर्व पत्रकारांनी सदर घटनेचा निषेध करून विवेक काकड अंजनगाव सुर्जी यांच्यावर कडक कारवाईची मागणी स्थानिक पत्रकारांनी अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वानखडे यांना केली.या प्रकरणाची सविस्तर तक्रार दैनिक पुण्यनगरी चे प्रतिनिधी प्रवीण बोके यांनी अंजनगाव पोलीस स्टेशनला दिली.याबाबतची गंभीर दखल ठाणेदार दिपक वानखडे यांनी घेतली असून पोलीस प्रशासन विवेक काकड याच्या मागावर आहेत.