
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत शासनाव्दारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येते.प्रशिक्षण कालावधी हा साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते.प्रशिक्षण यशस्विरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो.या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा आदिवासी प्रवर्गातील हवा.उमेदवाराचे वय १ डिसेंबर २०२२ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण तसेच दि. १५ मार्च २०२३ रोजी ३० वर्ष पूर्ण केलेले असावे.उमेदवार किमान दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा.सद्यस्थितीत तो कोणतेही शिक्षण अथवा प्रशिक्षण घेत नसावा.इच्छुक उमेदवारांनी दि.३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता,माहिती व मार्गदर्शन केंद्र,जयस्तंभ चौक,मातोश्री मंगल कार्यालयामागे,लाल पुलाजवळ,अचलपूर,कॅम्प परवाडा ता.अचलपूर येथे संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०७२२३-२२१२२०५ तसेच भ्रमणध्वनी क्रमांक ७७०९४३२०२४ येथे संपर्क साधावा. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला,दहावी उत्तीर्णची गुणपत्रिका,उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे ऑनलाईन कार्ड,प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास कार्यालयात नाव नोंदविल्याचे नोंदणी कार्ड इत्यादी आवश्यक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती व अलीकडच्या काळातील छायाचित्र जोडणे आवश्यक आहे.यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करु नये.इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अ.सं.ठाकरे यांनी केले आहे.