दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर ( प्रतिनिधी) -आज दि. 26 नोव्हेंबर रोजी प.पू .गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगांवकर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर वक्ता म्हणून शिक्षिका अश्विनी कदम या उपस्थित होत्या. सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच प.पू.गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यानंतर अश्विनी कदम यांनी संविधान दिनाचे महत्त्व मुलांना सांगितले. संविधान दिन का साजरा केला जातो? तसेच संविधान म्हणजे काय? त्या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ज्याप्रमाणे टीव्ही चालवण्यासाठी रिमोट आहे. त्याच पद्धतीने आपला भारत देश चालवण्यासाठी संविधान आहे. अशा सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व पटवून दिले.
यानंतर देगांवकर सरांनी मुलांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन आपले कर्तव्ये जाणून सतत कार्य करावे असे सांगितले. मराठी हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेत संविधानाचे वाचन करण्यात आले.
याप्रसंगी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यालयात चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यात इ.2री ते 7 वी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अभ्यासपूरक मंडळ प्रमुख तोटावार सुरेखा यांनी केले.