दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
अकोला दि. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित भारतीय संविधान हा अव्हितिय राष्ट्रीय मसुदा असुन राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्याय समतेचा मार्ग आहे असे मत बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी व्यक्त केले
भारतीय संविधान ७३ व्या गौरव दिनानिमित्त २६ नोव्हेंबर २०२२ शनिवार रोजी अकोला शहरातील श्री क्षेत्र असलेल्या अशोक वाटिका येथे अकोला जिल्हा बहुजन जनता दल शाखेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून पंडितभाऊ दाभाडे बोलत होते
कार्यक्रमाचे संचालन प्रबुद्ध सपकाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज
अंभोरे यांनी केले यावेळी अजय मोरे रमेश तायडे दीपक शेवाळे रमेश धनोकार बाबुराव गजबे राजेश ठाकरे विलास नरवाडे रंजीत जाधव चे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते