
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई :अक्षयच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीविषयी, निवडलेल्या भूमिकांविषयी त्याला प्रश्न विचारण्यात आले. पोलिसाच्या भूमिकेनंतर आता एनसीबी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार का, या प्रश्नावर त्याने उत्तर दिलं. एनसीबी अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याची ऑफर करण्यात आली, तर ती देखील मला साकारायला आवडेल असं अक्षय यावेळी म्हणाला गेल्या दोन वर्षांपासून सामसुम असलेल्या बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीच्या निमित्ताने दिवाळी साजरी होत आहे. चित्रपटगृहे अवघी 50 टक्के क्षमतेने सुरू असूनही तब्बल 127 कोटींची कमाई सूर्यवंशीने केली आहे.या निमित्ताने अभिनेता अक्षय कुमार याने नुकताच पत्रकारांशी संवाद साधला.
त्या दरम्यान पत्रकारांच्या विविध प्रश्नांना त्याने उत्तरं दिली. दिवाळीच्या निमित्ताने दोन वर्षांनी बॉक्स ऑफिसवर दिवाळी साजरी होत आहे, याबाबत त्याने समाधान व्यक्त केलं. त्याचसोबत त्याचे आगामी चित्रपट, सूर्यवंशी या चित्रपटावेळचे अनुभव, ओटीटीचा वाढता प्रभाव आणि एकंदरच कोरोनानंतर बदललेलं अर्थकारण यांबाबत त्याने सविस्तर उत्तरं दिली.
कोरोनानंतर बॉलिवूडमध्ये बदललेल्या अर्थकारणाबाबतही त्याने सविस्तर सांगितलं. ओटीटीमुळे लोकांची आवड समृद्ध झाली आहे. आशय, मांडणी, निर्मिती आणि त्या कलाकृतीचं तिकीटबारीवरचं यश यांची सांगड घालणारं निश्चित असं काही समीकरण नसल्याचंही तो यावेळी म्हणाला. ओटीटीच्या वाढत्या प्रभावामुळे पुढील वर्षी एप्रिल-मे दरम्यान डीजिटल माध्यमावरही एका वेबसीरीजमधून पदार्पण करत असल्याची माहिती देखील त्यांनी पत्रकारांना दिली.
.