दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने ठाणे इथे मंत्री महोदय श्री.एकनाथजी शिंदे साहेब, राज्यमंत्री कु. आदिती ताई तटकरे, श्री.बच्चूभाऊ कडू, पारनेरचे आमदार श्री.निलेश लंके, श्री.नितीनजी बानुगडे पाटील, पद्मश्री डाॅ.श्री.तात्याराव लहाने, यांच्या हस्ते “देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प” उभारल्याबद्दल “कोविड योद्धा सन्मान पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खा.डाॅ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या वतीने केलेला हा सन्मान आदरयुक्त स्विकार करून धाराशिव साखर कारखान्यात ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित करण्यात माझ्या सर्व सहकार्यांना हा सन्मान समर्पित करीत आहे. असे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी सांगितले