
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी शहाबाज मुजावरकोल्हापुरातील दोनमाजी मंत्री ,आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडें यांचा पाठिंबा विधानपरिषद ला भाजपला विधान परिषद ची लढत चुरशीची होण्याची शक्यता
विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार विनय कोरे व प्रकाश आवाडे यांच्या पाठिंब्यामुळे भारतीय जनता पक्षाचे बळ वाढणार आहे. या दोघांकडे निर्णायक मते आहेत आणि गेल्या निवडणुकीत या दोघांनीही पालकमंत्री सतेज पाटील यांना साथ दिली होती, त्यामुळेच या दोघांचे होणाऱ्या निवडणुकीत महत्त्व वाढले आहे.विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, असा सामना निश्चित आहे. भाजपचा उमेदवार कोण? याचा उलगडा येत्या तीन दिवसात होईल असे चंद्रकांत दादा यांनी घोषित केले पण राज्याच्या राजकारणात आपण भाजपसोबत असल्याचे सांगत कोरे व आवाडे यांनी काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजप देईल, त्या उमेदवाराच्या मागे राहू, अशी ग्वाही दिली आहे. कोरे यांच्याकडे पन्हाळा, मलकापूर नगरपालिकेसह जिल्हा परिषदेतही मतदार आहेत. त्याचबरोबर हातकणंगले आणि जयसिंगपूर नगरपालिकेतही त्यांना मानणारा वर्ग आहे.आगामी विधानसभेच्या दृष्टीने करवीर, शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील काही मते ते शब्दावर फिरवू शकतात. सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत कोरे यांचा पाठिंबा पालकमंत्री सतेज बंटी पाटील यांच्या विजयात मोलाचा ठरला होता. आवाडे यांच्याकडेही इचलकरंजीसह हुपरी, जयसिंगपूर नगरपालिकेत मतदार आहेत. जिल्हा परिषदेत त्यांच्या गटाचे दोन सदस्य असले तरी विधानसभेचा विचार करताना हातकणंगले व पेठ वडगावमधील मतेही ते भाजपकडे वळवू शकतात.गोकुळ’च्या निवडणुकीत कोरे यांनी सत्तारूढ गटाच्या विरोधात पालकमंत्री पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला पाठिंबा दिला होता. या निवडणुकीतही त्यांची भूमिका हीच राहील, अशी शक्यता असतानाच त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. आता भाजपचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर या संदर्भातील घडामोडी स्पष्ट होतील. मलकापुरात तिढा शक्य मलकापूर नगरपालिकेत जनसुराज्य-शिवसेना एकत्र आहेत, तर भाजपचा नगराध्यक्ष आहे. या पालिकेतील शिवसेनेचे नेतृत्व माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर करतात. सरूडकर-कोरे यांच्यात मतभेद आहेत, त्यामुळेच ‘गोकुळ’ निवडणुकीत कोरे यांनी सतेज पाटील बंटी असं माननीय मंत्री मुश्रीफ यांच्या गटाला पाठिंबा दिल्यानंतर सरूडकर यांनी सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.