
दै. चालु वार्ता
मध्य – औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
जिल्ह्यातील सर्वात मोठी वादग्रस्त कार्यवाही , नियोजन बद्ध पद्धतीने पाङापाङीच्या दिशेने पहिले पाऊल*
शहराचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लेबर कॉलनी , विश्वासनगर येथील शासकीय निवासी इमारती ( २० एकर जागा ) जीर्ण झाल्याने त्या पाडण्यासाठी विविध पथकांची नेमणूक केली आहे . या पथकांनी करावयाच्या पुढील कार्यवाहीबाबत लवकरच आदेश देण्यात येतील असेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या आढावा बैठकीत सांगितले .
या आढावा बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे , उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे , मंदार वैद्य , पोलीस उपाधिक्षक उज्जवला बनकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
नेमण्यात आलेले पथक पुढील प्रमाणे -:
१) विद्युत पुरवठा खंडीत करून महावितरणाची यंत्र सामग्री / मालमत्ता सुरक्षित स्थळी हलविणेबाबत ➖कार्यकारी अभियंता ( शहर ) महावितरण कंपनी , औरंगाबाद .
२) दुरध्वनी पुरवठा खंडीत करुन यंत्र सामग्री / मालमत्ता सुरक्षित स्थळी हलविणेबाबत ➖ उपमहाव्यवस्थापक , भारत संचार निगम लि. औरंगाबाद .
३) पाणी पुरवठा खंडीत करुन यंत्र सामग्री / मालमत्ता सुरक्षित स्थळी हलविणेबाबत ➖ कार्यकारी अभियंता , पाणी पुरवठा विभाग , महानगरपालिका , औरंगाबाद .
४) सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वळती करणेबाबत ➖ सहायक पोलिस आयुक्त , वाहतूक शाखा , पोलीस आयुक्तालय , औरंगाबाद .
५) आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयातील वार्ड / आरोग्य सुविधा सुसज्ज ठेवणेबाबत ➖ अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद .
६) नकाशा तयार करुन निवासस्थाने पाडण्याची कार्यवाही करण्याअगोदर सदरील निवासस्थानात वास्तव्यास असणाऱ्या सर्व नागरीकांना घरातून बाहेर काढणे इमारतीचा ताबा घेणे , याबाबतच्या आवश्यक त्या नोंदी ठेवणे आदी बाबत ➖ कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग , औरंगाबाद .
७) आवश्यक वाहने यंत्रसामग्री उपलब्ध करुन देणेबाबत ➖ प्रादेशिक परिवहन अधिकरी औरंगाबाद .
८) आवश्यक वाहने , यंत्रसामग्री उपलब्ध करुन देणेबाबत ➖
८.१] प्रादेशिक परिवाहन अधिकारी , औरंगाबाद .
८.२] जिल्हा खनिकर्म अधिकारी , औरंगाबाद .
८.३] कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग ,औरंगाबाद .
८.४] कार्यकारी अभियंता , यांत्रिकी विभाग , मनपा औरंगाबाद .
९) पंचनामा पथक ➖
९.१] तहसिलदार , खुलताबाद .
९.२] तहसिलदार , कन्नड .
१०) शोध पथक ➖
१०.१] तहसिलदार , वैजापूर .
१०.२] तहसिलदार , गंगापूर .
११) प्राप्त अजाची छाननी करणे ➖ मुख्याधिकारी , नगर परिषद , कन्नड .
१२) बचाव साहित्य उपलब्ध करुन देणेबाबत ➖
१२.१] जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी , औरंगाबाद .
१२.२] मुख्य अग्नीशमन अधिकारी , मनपा , औरंगाबाद .
१३) समन्वय/प्रतिबंधात्मक आदेश ➖
१३.१] पोलीस उप अधिक्षक , मुख्यालय पोलीस अधिक्षक , औरंगाबाद – ग्रामीण .
१३.२] नायब तहसिलदार , गृहशाखा जिल्हाधिकारी , कार्यालय , औरंगाबाद .
१४) अग्नीशमन यंत्रणा व जवान सुसज्ज ठेवणेबाबत ➖ मुख्य अग्नीशमन अधिकारी , मनपा , औरंगाबाद .
१५) चित्रिकरण करणारे कॅमेरे उपलब्ध करुन देणेबाबत ➖ उपजिल्हा निवडणूक अधिकारी ,
जिल्हाधिकारी कार्यालय , औरंगाबाद .
१६) पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था करणेबाबत ➖ जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय , औरंगाबाद .
१७) मजुर / हमाल पुरविणेबाबत ➖ सहायक आयुक्त कामगार , औरंगाबाद .