
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेच्या वेळी दर्शनाच्या रांगेतील एका दाम्पत्याला वारकरी प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत महापूजा करण्याचा मान दिला जातो. परंतु गेल्या वीस महिन्यांपासून कोरोनाच्या सावटामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद होते. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील वीणेकरी लोकांमधून चिठ्ठी टाकून त्या दाम्पत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा मान देण्यात येत होता. यंदा यात्रा भरली असल्याने दर्शनाच्या रांगेतील कोंडीबा देवराव टोणगे (वय 58) आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई कोंडीबा टोणगे (वय 55, राहणार मु. निळा, पो. सोनखेड, ता. लोहा, जिल्हा नांदेड) या दाम्पत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. शेतकरी असलेले हे दाम्पत्य 1991 पासून सलग तीस वर्षे पंढरीच्या वारीसाठी येत आहे.