
भारतीय ट्रायबल पार्टी चा जाहीर पाठींबा-डॉलीताई डगळे
अकोले
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एस.टी कर्मचारी सह अहमदनगर जिल्हातील अकोले बस आगारातील एस टी कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपाला सध्या अकोले तालुका सह जिल्हातूनही वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय संघटनांचा पांठींबा मिळत आहे ,एस टी कर्मचारी यांना शासकीय भत्ते व लाभ इतर शासकीय कर्मचारी यांच्या प्रमाणेच मिळावे व एस टी महामंडळ चे विलणीकरण हे राज्य शासनात करण्यात यावे अश्या आनेक मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील सर्व कर्मचारी वाहक व चालक हे संपावर आपल्या मागण्या ठामपणे मांडून आहेत ,जोपर्यंत राज्य शासन या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत सर्व कर्मचारी हे *लढा विलणीकरणाचा* या संपामध्ये संपूर्ण परिवारासह कर्मचारी सामील झालेले आहेत,या कर्मचारी व एस टी महामंडळ यांचे विलणीकरण राज्य शासनात झाले पाहिजे या जाहीर व रास्त मागणीला आज रोजी अकोले बस आगार या ठिकाणी भारतीय ट्रायबल पार्टी च्या अहमदनगर जिल्हा प्रभारी डॉली गणेश डगळे सह अकोले शहर महिला अध्यक्षा चित्रा धोंगडे ,व अकोले तालुका महिला संघटक माधुरी सुनिल डगळे यांच्या उपस्थित एस टी कामगार यांना जाहीर पांठींबा देण्यात आला आहे ,लवकरात लवकर राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांना शासनात समावेश करावा