
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
लोहारा:लोहारा शहर व आसपासचे 6 गावे निम्न तेरणा धरणापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहेत.
सदर गावांचा लोकसंख्यावाढीचा विषय विचारात घेऊन या निम्न लोअर तेरणा(माकणी) धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा.अशी मागनी संभाजी ब्रिगेड का.आ.ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या वेळी संभाजी ब्रिगेडचे का.आ.तालुकाध्यक्ष महेश गोरे कार्यध्यक्ष तानाजी पाटील, शहरध्यक्ष प्रशात थोरत, नानासाहेब गोरे,आकाश निर्मळे, आमीन मुलानी ,सलीम सय्यद, सुरज माळवदकर, आदी पदधीकारी उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटले आहे की
श्री. अण्णा डांगे पाणीपुरवठा मंत्री असताना लोहारा व सभोवतालच्या गावासाठी एकत्रित पाणीपुरवठा योजनेची मागणी आहे. सन्माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी विषयांकित मागणी न्याय असल्याचे शिक्कामोर्तब करून सक्षम यंञणेकडे पाठपुरावा करावा असे आदेशित केले होते.
संबंधित यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा करूनही कांही वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. प्रत्येक पाच वर्षात निवडणुकीत हा विकासाचा मुद्दा म्हणून चर्चिला जातो,व प्रत्येक उमेदवार हा पाणीपुरवठा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देतो.परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही.
तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी नागराळ, बेंडकाळ, मार्डी, मोघा(खू.), मोघा(बु.), लोहारा(खु.)व लोहारा शहर आदी गावांचा पाणीप्रश्ना साठी पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर सुरू करुन भूकंप पिडीत, दुष्काळाने व पाण्यासाठी ञस्त असणाऱ्या या गावांना सदर पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात यावी. माकणी धरण हे लोहाऱ्यापासून ६ ते ७ किमी.अंतरावर आहे,यापेक्षा कमी अंतरावर खात्रीलायक पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने निम्न लोअर तेरणा प्रकल्पाशिवाय पर्याय नाही. सदर गावे ही लोहाऱ्यापासून २ ते ३ किमी.अंतरावर आहेत. या परिसरात शास्वत व व्यवहार्य पाणीपुरवठा योजना सुरू नसल्याने या गावांमध्ये व शहरामध्ये उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होते सामान्य जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होतात.त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी या परिसरातील नागरिकांची अवस्था होते. आणीबाणीच्या काळात शासनाचा अनावश्यक पैसा खर्च होतो.सदर योजना आपल्या माध्यमातून लवकरात लवकर सुरू झाली तर या परिसरातील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण कायमची थांबेल आसे या निवेदनात म्हटले आहे याचा आपण गांभीर्याने विचार करावा व लवकरात लवकर या संबंधी कार्यवाही करावी ही विनंती.
अन्यथा संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी या वंचित नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभा करेल , असा अहवाल संबंधितांकडे सादर व्हावा. आशा आशयाचे निवेदन तहीसीलदार लोहारा यांच्या मार्फत जिल्हाधीकारी यांना तसेच गटविकासधीकारी लोहारा यांच्या मार्फत जिल्हापरीषद उस्मानाबाद व प्रकल्प संचालक
राज्य पाणी व स्वच्छता मिशण चे संचालक यांना देन्यात आले आहे