दै चालु वार्ता वृत्तसेवा : /
मुंबई : हसन मुश्रीफांनी दावा केलाय की, मला चंद्रकांत पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफ दिली होती. मी गेलो नाही म्हणून मला टार्गेट केलं जातंय. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, कोणी ऑफर दिली मुश्रीफांना? आम्ही असं ऑफर घेऊन फिरत थोडी असतो. असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, कोणालाही द्यायला.ङ्क असे म्हणत फडणवीस यांनी मुश्रिफांना सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच पुढे बोलताना किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. गृहमंत्र्यांनी केलेली कारवाई मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल, अशी खोचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोमय्या यांच्यावरील ही कारवाई मुख्यमंत्री कार्यालयाची नाही तर गृह मंत्रालयाची आहे, असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. याच सर्व घडामोडींबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी, नसेल माहिती मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांनी केलेल्या कारवाईची, असा उपरोधिक टोला लगावला आहे.देवेंद्र फडणवीस यावर बोलताना म्हणाले की, मला असं वाटतं की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की, एक व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करायला जातो आणि पोलीस त्याला अडवतात. यासाठी कारण सांगितलं जातं की, तिथे ज्यांच्याविरोधात तक्रार करायची आहे, त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील, म्हणून तुम्हाला जाता येणार नाही. स्वतंत्र भारतात, अशाप्रकारची कायदा-सुव्यवस्था यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नसेल. महाराष्ट्रात तर नाहीच नाही. असे देवेंद्र फडणवीस मीडियाशी बोलताना म्हणाले.त्यामुळे एकूणच जे काही चाललं आहे, ते भयानक आहे. पण भाजप काही थांबणार नाही. सातत्यानं भ्रष्टाचाराविरोधातील लढाई भाजप लढत राहिल.ङ्क अशहीं देवेंद्र फडणीस यावेळी म्हणाले