
दैनिक चालु वार्ता,शिरपूर
प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
रूमित केमिकल फॅक्टरी वाघाडी येथे 31/8/2019 रोजी भिषण स्पोट होऊन 14 लोक ठार व 20 जण गंभीर जखमी झाले असुन कंपनीचे एम डी संजय बाबुराव वाघ यांनी मयतांना 5 लाख व गंभीर जखमींना 2:5 ( अडीच लाख ) रूपये देण्याचे घोषित केले होते मयताच्या नातेवाईकांना 5 लाख रूपये मिळाले परंतु आज 26 महीने झाले तरीही गंभीर जखमी ना घोषीत केलेले अडीच लाख रूपये दिलेले नाही म्हणून आम्ही 11/10/2021 ला आमरण उपोषण सुरू केले होते परंतु तहशीलदार साहेब यांनी 13/10/2021 रोजी कंपनीने प्रतिनिधी विजय कुलकर्णी यांनी तहशीलदार साहेब यांच्या समोर तुमच्या मागण्या साठी 15 दिवस द्या आम्ही कंपनी प्रशासनाला कळवून पूर्ण करू परंतू आज एक महिना झाल्यावर देखील तहशीलदार यांनी कंपनी कडून आमची मागणी अडीच लाख रूपये देण्याचे आश्वासन पूर्ण केलेले नाही त्यामुळे आज पासून आम्ही आमची मागणी पूर्ण होई पयॅत आमरण उपोषण करणार आहोत आमच्या जिवाचे बरे वाईट काही झाल्यास तहशीलदार साहेब व कंपनी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा श्री उदयनराजे जाधव पाटील
मा अध्यक्ष तालुका राष्ट्रवादी युवक काॅग्रेस पाटीॅ शिरपुर व गणेश भामरे राकेश माळी भिषण पावरा जितेंद्र मोरे प्रकाश पावरा रमेश पावरा रोहित बागले यांनी दिला आहे