
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
लोहारा:कंगना राणावत हिने जे काही वक्तव्य केले त्याचा निषेध करत तीने जे वक्तव्य
केले ते असे “१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते,खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले”.असे निंदनीय वक्तव्य करून संपूर्ण देशासह स्वातंत्र सैनिकांचा अपमान केल्याने तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा.
कला क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे ८ नोव्हेंबर २०२१ रोजी कंगना राणावत यांना राष्ट्रपती हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. कला क्षेत्र वगळता सिने अभिनेत्री कंगना राणावत या प्रत्येक क्षेत्रात नको त्या ठिकाणी बेताल वक्तव्य करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करत असतात.याच कारणाने प्रसिद्ध सोशल मिडिया अँप ट्वीटरने कंगना राणावत हीचे अकाऊंट बंद केले होते.
पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर कंगना राणावत हीचे पाय जमिनीवर नसून सध्या त्या हवेत आहेत.त्यांनी प्रसार माध्यमांसमोर भारताचा अवमान केला आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे स्वातंत्र मिळविण्याकरिता , भगतसिंग,चंद्रशेखर आझाद,सुभाषचंद्र बोस,राजगुरू,सुखदेव यासह बाल शिरीष कुमार यांसारख्या आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या कित्येक स्वातंत्र्य सैनिकांचा तसेच हुतात्मा शहीदांचा घोर अपमान झाला असून या निंदनीय वक्तव्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे.त्यामुळे कंगना राणावत यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचा आपण गांभीर्याने विचार करून पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा व तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.सध्या देशात सर्वच राजकीय पक्षांचे टोळीयुद्ध सुरू आहे. देशात अनेक प्रश्न प्रलंबित असतांना मूळ मुद्द्यांवरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी एकमेकांवर टिका करण्यासाठी उठसूट खालच्या स्तरावर भावनेच्या भरात बरळत असतात त्यामुळे देशात संभ्रमाचे वातावरण होत आहे.सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे मान खाली घालावी लागत आहे.पद्मश्री पुरस्कार प्राप्त कंगना राणावत यांनी जे आक्षेपार्य वक्तव्य केले त्यामुळे देशासाठी रक्त सांडणाऱ्या सैनिकांचा, हुतात्म्यांचा मोठा अपमान झालेला आहे.पुरस्कार मागे न घेतल्यास पद्मश्री पुरस्काराचा अपमान होईल व राष्ट्रपतींचाही अपमान होईल त्यामुळे
राष्ट्रपतींनी दिलेला सर्वोत्तम पुरस्कार त्यांनी मागे घ्यावा व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.पुरस्कार मागे न घेतल्यास व गुन्हा दाखल न झाल्यास जिजाऊ ब्रिगेड राज्यभर आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला लोहारा पोलिस निरीक्षक काकडेसाहेब यांच्याकडे निवेदन देवून, सोमवारी (15)रोजी कंगना राणावत हिच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले . यावेळी जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष रंजना हासुरे, सचिव अनुसया माळी, कार्याध्यक्ष प्रतीभा परसे, कोशाध्यक्ष मेघा जाधव आदि पदधीकारी उपस्थित होत्या.