
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
पुणे : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे.
हा फोटो बॉलिवूड अभिनेत्याच्या नवीन सिनेमातील लुकचा आहे. या लुकची सोशल मीडियावर खुप चर्चा आहे. हा फोटो पाहून तुम्हाला अभिनेता ओळखायचा आहे.
फोटोत काय?
फोटोत तुम्ही पाहू शकता अभिनेत्याने लाल कलरची साडी घातली आहे, तर लाल कलरची टीकली लावली आहे. या साडीत तो किन्नर दिसत आहे. हा या अभिनेत्याचा आगामी सिनेमातला लुक आहे. या लुकची खुप प्रशंसा होत आहे. तसेच अभिनेत्याच्या अभिनयाचे देखील कौतूक होत आहे.
कोण आहे अभिनेता?
हा अभिनेता बॉलीवूडचा दिग्गज नवाजुद्दीन सिद्दीकी आहे. त्याने शनिवारी त्याच्या आगामी ‘हड्डी’ चित्रपटातील नवीन लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला. या चित्रपटात नवाजुद्दीन एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘हड्डी’ चित्रपटातील नवाजचा हा लूक खुपच अप्रतिम आहे, त्याला हा लुक पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.
नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये नवाजुद्दीनने लाल सिल्कची साडी घातली असून त्याच्या कपाळावर लाल टिकली आहे. तसेच यावर त्याने पांढरा हेवी नेकलेस आणि कानातले घातले आहे. हा फोटो पोस्ट करत नवाजुद्दीनने लिहिले, ‘आम्ही तुमच्या नजरेत अटक होणार आहोत, आम्ही जगत नाही, आम्ही अजूनही जगत आहोत’.
दरम्यान नवाजुद्दीनच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. ‘कोणी इतके अष्टपैलू कसे असू शकते’, असे एका युझरने लिहले. तर दुसऱ्या युझरने लिहले की, ‘तुम्ही खरोखरच एक दिग्गज आहात. तर आणखी एका युझरने लिहले की, ‘हा माणूस ऑस्करसाठी पात्र आहे.
नवाजुद्दीनच्या या फोटोची खुप चर्चा आहे. तसेच त्याच्या चित्रपटाची प्रेक्षकांना खुप उत्सुकता आहे.