दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
नवी दिल्ली : इंडोनेशियाच्या संसदने मंगळवारी नवीन गुन्हेगारी कायदा आणला. या कायद्यानुसार, लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरणार आहे.
लग्नापूर्वीच्या सेक्सवर या देशाने बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास एक वर्षांपेक्षा अधिकचा तुरुंगवास सहन करावा लागू शकतो. हा नियम इंडोनेशियातील नागरीक आणि देशात राहणाऱ्या विदेशी नागरिकांवर लागू असेल. हा नियम दोघांसाठी सारखाच लागू असेल. त्यामुळे इंडोनेशियात जाणार असाल तर सावध असा.
लग्नानंतर पत्नी अथवा पती ऐवजी दुसऱ्या व्यक्तीशी शारिरीक संबंध ठेवल्यास कारवाई होऊ शकते. अशा संबंधावर बंदी घालण्यात आली आहे. याप्रकरणात पत्नी, पती अथवा मुलांनी तक्रार दिल्यास पोलिसांना थेट कारवाई करता येईल.