
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
नांदेड :- लोकशाही मार्गाने विविध निवेदने देऊन आंदोलने उपोषणे करून हि अद्याप बेरोजगार दिव्यांगांना पुर्णतः न्याय न मिळाल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडुन दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण २०१८ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासह ईतर प्रलंबित एकुण २१ मागण्यांच्या अणुषंगाने दि ३ डिसेंबर २०२१ रोजी जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग जन आक्रोश मोर्चा काढुन काळा दिवस पाळत एकाच क्षणी विविध प्रकारचे तिवृ ते अति तिवृ स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन महामहीम राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत तसेच मेल आणि ट्विटरद्वारे सादर करण्यात आले आहे या निवेदनावर बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे संस्थापक अध्यक्ष राहुल साळवेसह नागनाथ कामजळगे.संजय धुलधाणी.पिंटुदादा बद्देवाड.रवि कोकरे.आनंदा माने.आणि संतोष गज्जलवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.या मोर्चा तथा आंदोलनाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे थेट जिल्हा परिषद तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत महानगरपालिकासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचे राहुल साळवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.तसेच या आक्रोश मोर्चा तथा आक्रमक आंदोलनात शेकडोंच्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन कार्तिक भरतीपुरम.सुनिल जाधव.फेरोज खान महंमद अली खान.सागर नरोड.विष्णु जायभाये.प्रदिप हणवते.शेख अजीज.शिवाजी सुर्यवंशी.निहाल पटेल.महाविर गायकवाड.शेषेराव वाघमारे.संभाजी सोनाळे.व्यकंट कदम.सुधाकर वाघमारे.शेख बाबाभाई.भोजराज शिंदे.नागनाथ गोंदले.सय्यद आरिफ.नारायण नवले.शेख आतिक.राजु ईराबणीन.शेख माजीद.कमलाकर टाकळिकर.प्रकाश नागोरे.ज्ञानेश्वर बेळे.माधव शिरूळे.परमेश्वर शेटवाड.लक्ष्मण गोरालाड.सय्यद पिरसहाब.देवेंद्र खडसे.हणमंतराव राऊत.गोविंद बोड्डेवार.दादाराव वाघमारे.व्यंकटि सोनटक्के.अंबादास धोत्रे.शेख गौस.प्रशांत हणमंते.सिद्धोधन गजभारे.भाऊसाहेब टोकलवाड.विठ्ठल सुर्यवंशी.राजकुमार देवकर.संघरत्न सोनाळे.शेख शाहजहान.माधव बेरजे.संजय सोनुले.दिलिप कांबळे.संजय बोईनवाड.अंकुश हट्टेकर.संदेश घुगे.गणेश वर्षेवार.धोडिंबा कांबळे.कमलबाई आकाडे.भाग्यश्री नागेश्वर.कल्पणा सप्ते.सुमित्रा शिरूळे.सविता गावते.रेणुका फसकुलवाड आणि मनिषा पारधेसह लुईस ब्रेल दि ब्लाइंड मेन असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा.दिव्यांग आघाडी मुखेड.बेरोजगार दिव्यांग समीती बिलोली – हदगाव – मुदखेड – लोहा यांनी केले आहे.
* ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी काळा दिवस पाळत उद्रेक पेटविण्याचे कारण/मागण्या :- १) दि ७ एप्रिल २०१७ रोजी संपुर्ण देशभर लागू करण्यात आलेला दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम – २०१६ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी तसेच अंमलबजावणी न करणार्या दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
२) दिव्यांग व्यक्तीसाठीचे महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण – २०१८ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी तसेच अंमलबजावणी न करणार्या दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
३) संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांगांचे गत पाच ते सहा महिन्यांपासूनचे थकित वेतन तत्काळ खात्यावर जमा करून या विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांगांना देण्यात येत असलेले वेतन रूपये १००० वरून रूपये ३००० एवढे करण्यात यावे.
४) ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाकडून ग्राम पंचायती/पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद यांच्या मार्फत दिव्यांगांच्या कल्याण व पुणर्वसनासाठी निर्गमित केलेल्या सन २०१० पासुन ते आजवरच्या सर्व शासन निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी तसेच अंमलबजावणी न करणार्या दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
५) नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून नगरपंचायती/नगरपालिका – नगरपरीषदा आणि महानगरपालिका यांच्या मार्फत दिव्यांगांच्या कल्याण व पुणर्वसनासाठी निर्गमित केलेल्या सन २०१० ते आजवरच्या सर्व शासन निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी तसेच अंमलबजावणी न करणार्या दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
६) बेरोजगार दिव्यांगांना स्वंयरोजगारासाठी २०० स्क्वेअर फूट जागा.५ टक्के राखीव गाळे देण्यात यावे तसेच बसस्थानके/रेल्वे स्थानके यासह सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात कॅंटिनसाठी जागा.पार्किंग ठेका.आठवडी बाजार मंडई वसुली ठेका उपलब्ध करून देण्यात यावे.
७) नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार दिव्यांगांसाठी वर्ग १ ते वर्ग ४ या शासकीय भरतीसाठी स्वतंत्र दिव्यांग भरतीचे आयोजन करण्यात यावे.
८) नांदेड जिल्ह्यातील सर्व राष्ट्रियकृत बॅंकांकडून बेरोजगार दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवलसह इतर सर्व प्रकारचे कर्ज तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे तसेच ज्या राष्ट्रीय बॅंका दिव्यांगांना कर्ज उपलब्ध करून देत नाहीत अशा सर्व बॅक अधिकार्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
९) नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार दिव्यांगांना अपंग (दिव्यांग) वित्त व विकास महामंडळाकडून गत अनेक वर्षांपासून उपलब्ध करून देण्यात येत नसलेले कर्ज तत्काळ उपलब्ध करून देणे तसेच त्यात ५० टक्के सबसिडी देण्यात यावी आणि यापुर्वी कर्ज घेतलेल्या दिव्यांगांचे कर्ज पुर्णतः माफ करून त्यांना नव्याने कर्ज पुरवठा करण्यात यावे.
१०) महानगरपालिका नांदेड कडिल BSUP योजनेतील शिल्लक असलेले घरकुले उर्वरित सर्व दिव्यांगांना त्वरित देण्यात यावे.
११) नांदेड शहरासह संपूर्ण जिल्हाभरातील बेरोजगार दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी फुटपाथवर अधिकृत जागा उपलब्ध करून देण्यात यावे.
१२) महानगरपालिका/नगरपालिका – नगरपरीषदा आणि नगरपंचायतीसह जिल्हापरिषद/पंचायत समित्या आणि सर्व ग्रामपंचायती यांच्या कडील दिव्यांगांचा शासन निर्णयीत राखीव ५ टक्के राखीव निधीतून बेरोजगार दिव्यांगांना दरमहा रूपये २.००० एवढा रोजगार भत्ता देण्यात यावे.
१३) रेल्वे स्थानके आणि बस स्थानके येथे बेरोजगार दिव्यांगांना खेळणी विक्री.रिंग.चिप्स – कुरकुरे विक्री करण्यासाठी अधिकृत परवाना देण्यात यावे.
१४) नांदेड जिल्ह्यात बेरोजगार दिव्यांगांसाठी रोजगार मेळावे घेण्यात यावे तसेच स्वंयरोजगार उभारण्यासाठी सबसिडी दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे तसेच दिव्यांगांसाठी परीचय मेळाव्यासह विवाह मेळावे आयोजित करण्यात यावे.
१५) शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून ते आजवरचा स्थानिक क्षेत्र विकास निधीतील आणि एम्पीलैड्स मधील दिव्यांगांचा अखर्चित राखीव निधी तत्काळ खर्च करण्यात यावे तसेच हा निधी खर्च न करणार्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
१६) नांदेड शहर तथा संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांना शासन निर्णयानुसार अंत्योदय योजनेतील पिवळे राशन कार्ड तत्काळ वितरीत करण्यात यावे तसेच दिव्यांगांना राशन दुकान वितरीत करण्यात यावे.
१७) नांदेड शहर तथा संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांना शासन निर्णयानुसार विविध घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावे.
१८) संजय गांधी निराधार योजना समीतीसह जिल्हा नियोजन समिती आणि उर्वरित सर्व जिल्हा तथा तालुका स्तरीय समीत्यांवर दिव्यांगांना सदस्यत्व देण्यात यावे.
१९) सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांच्या कल्याण व पुणर्वसनासाठी दिव्यांगांना प्रतिनिधित्व देण्यात यावे.
२०) दिव्यांगांच्या कल्याण व पुणर्वसनासाठी शासन स्तरावरून आजवर विविध विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या सर्व शासन निर्णय/परीपत्रकांची तसेच दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे यांच्या पत्रकांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी तसेच अंमलबजावणी न करणार्या दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
२१) दि २ नोव्हेंबर २०२०.दि ३ डिसेंबर २०२० आणि दि ८ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या आक्रोश मोर्चेतील सर्व मागण्यांसह सर्व आंदोलने ऊपोषणातील मागण्या.