दै.चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा.
जव्हार:- जव्हारमध्ये मुख्य बाजारपेठ असलेल्या जुन्या पोलिस लाईन चाळीला भीषण आग लागली अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिकांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यासा यश आले आहे.सुदैवाने जीवितहानी टळली असून स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.मुख्य बाजारपेठ आणि राष्ट्रीय बँका याचा आवारात असल्याने नेहमीच या परिसरात लोकांची वर्दळ असत.जुनी व लाकडी चाळ असल्याने आगीचा भडका वाढत गेला,दरम्यान प्रथम शोभा आळे या महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या घराला आग लागली.घरात कुणीही नसल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले.या भीषण आगीत शेजारील काही घरांना झळ बसली असून सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.