
दैनिक चालू वार्ता
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
- *वाडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जननायक,क्रांतीसुर्य, धरतीआबा बिरसा मुंडा यांची जयंती साजरी.*
वाडा तालुक्यातील कॉंग्रेस च्या कार्यालयात जननायक,क्रांतीसुर्य धरती आबा,बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल पाटील (काका),किसान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, वाडा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, पालघर जिल्हा काँग्रेस सचिव अनंता वनगा, संजय भानुशाली ज्येष्ठ नेते मधुकर भानुशाली, वाडा तालुका युवक अध्यक्ष गणेश (बाळा) बाराठे,सेवादलाचे अध्यक्ष जगदीश केणे, सेवादल शहराध्यक्ष संदीप कराळे,प्रकाश काबाडी, नरेश ठाणगे आदी मान्यवर उपस्थीत होते.