
दै चालु वार्ता वृत्तसेवा
खा.ओमराजे निंबाळकर यांनी भुम न.प.चे.गटनेते संजय गाढवे यांच्या विकासकामांचे केले कौतुक
दैनिक चालू वार्ता
भूम प्रतिनीधी नवनाथ यादव
भूम:- भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आ.प्रा.डॉ तानाजीराव सावंत,उस्मानाबादचे जिल्हाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न झाला.
न.प.भूम गटनेते संजय गाढवे यांच्या विकासकामांचे कौतुक केले.भुम नगरपरीषदचे कार्य इतर नगरपरीषदांनी आचरणात आणावे असे यावेळी खा.ओमराजे निंबाळकर म्हणाले.तर संजय नाना मी तुमच्या सोबत आहे,असे आ. प्रा.डॉ.तानाजी सावंत म्हणाले. यावेळी भुम शहरातील १५ कोटी रुपयांच्या विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यावेळी डॅा.एपीजे अब्दुल कलाम, काळुबाई देवी,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती संभाजी महाराज अलमप्रभु उद्यान,महात्मा बसवेश्वर महाराज, शापींग सेंटर,तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभाग्रह,चौंडेश्वरी खुले नाट्यग्रह,सोबत भूम शहरातील ओंकार चौकातील स्कायवॉकच्या पुलाचे लोकार्पण करण्यात आले.त्यावेळी खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर, आ.प्रा.डॉ.तानाजी सावंत, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रवीण रणबागुल, शिवसेनेचे नेते गौतम लटके,जि प.सदस्य दत्ता साळुंके,उद्धव साळवे, नगराध्यक्षा सौ सुप्रीया वारे उपनगराध्यक्षा संयोगीता गाढवे ,नगरसेवक किरण जाधव ,सागर टकले संजय पवार, बालाजी अंधारे,सुरज गाढवे आदींसह तालुक्यातील,शहरातील पदाधिकारी,सरपंच,उपसरपंच कार्यकर्ते व नेते मंडळींची यावेळी उपस्थिती होते.