
दैनिक चालू वार्ता
परतूर प्रतिनिधी: नामदेव तौर
____________________
परतूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पार पडला ग्राहक मेळावा
परतूर : डिजिटल युगात बँकिंगचे अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले असतांना ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारात देखील मोठी वाढ झाली आहे. बँकेचे ऑनलाइन व्यवहार करतांना इतरांना ग्राहकांच्या खात्यात फेरफार करता येऊ नये यासाठी बँकेने आधुनिक प्रणालीचा उपयोग करणे आवश्यक आहे. ग्राहकांनी देखील अधिक सतर्क राहत आपल्या खात्यासंबंधीत एटीएम पिन, ओटीपी कोणाला सांगू नयेत. आपले एटीएम, चेकबुक हरवल्यास ताबडतोब बँकेला सूचना करावी. खात्याशी संबंधित ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार घडल्यास तातडीने बँकेशी शाखा आणि सायबर गुन्हे शाखेला माहिती द्यावी असे आवाहन परतूरचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या परतूर शाखेत सोमवारी सायंकाळी ५ वाजता ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी शाखा व्यवस्थापक अरबिंद मिश्रा, उपशाखा व्यवस्थापक मनोज शहा, मुख्यरोखपाल राहुल तुरे,विनोद जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ग्राहकांचे हित लक्षात घेऊन अनेक योजना बँकेने अंमलात आणल्या आहेत.ग्राहकांच्या गरजांनुसार कर्ज उत्पादने आणि सेवा बँकेकडून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अधिकाकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्राहकांनी सेवांच्या संदर्भात त्यांना असणाऱ्या अडचणी बँक प्रशासनाला अवगत करून द्याव्यात असे आवाहन शाखा व्यवस्थापक अरबिंद मिश्रा यांनी यावेळी केले.
या मेळाव्याला राधाकिशन काळे, प्रा.बद्रीणारायन टेकाळे,केशव बरकुले, बालाजी सांगुळे, रामदास तायडे, डॉ.शिवाजी पोकळे, परिमल पेडगावकर, रणजित डोळझाके, शंकर इंगोले, हर्षद जाधव, माऊली बरसाले,राहुल मुजमुले यांनी उपस्थिती होती.