
रावसाहेब पाटील शिंदे यांच्या अंत्यसंस्काराला जिल्ह्यातील जनसागर उसळला हजारोंच्या साक्षीने अखेरचा निरोप
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी-माधव गोटमवाड
लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांचे बंधू तथा माजी जिल्हा परिषद तथा विद्यमान जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब दगडुजी शिंदे यांचे काल बुधवारी मध्यरात्री दीड वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले ,कै. रावसाहेब पाटील शिंदे यांच्या पार्थिवावर काल बुधवारी दुपारी चार वाजता लोहा-कंधार मतदार संघातील हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले ,कै. रावसाहेब पाटील शिंदे म्हणजे लोहा-कंधार मतदार संघाचे आमदार शामसुंदर शिंदे यांचा उजवा हात म्हणून मतदारसंघात सर्व परिचित होते, माजी जिल्हा परिषद सदस्य ते विद्यमान जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून कै. रावसाहेब पाटील शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, दीनदलित यांच्यासाठी रावसाहेब पाटील शिंदे यांनी आपले सर्वस्व पणाला लावून त्यांच्या समस्या सोडवल्या आहेत ,2019 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांमध्ये आमदार शामसुंदर शिंदे यांच्या विजयामध्ये रावसाहेब पाटील शिंदे यांचे लाख मोलाचे योगदान आहे, साधा सरळ आणि प्रामाणिक आणि निस्वार्थी स्वभाव असलेल्या रावसाहेब पाटील शिंदे यांच्या अकाली जाण्याने लोहा-कंधार मतदार संघाचे अतोनात नुकसान झाल्याची भावना अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. रावसाहेब पाटील शिंदे यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,तीन भाऊ ,चार बहिणी,भावजय ,पुतणे, नातू, यांचा समावेश असून रावसाहेब पाटील शिंदे यांच्या अकाली जाण्याने लोहा-कंधार मतदार संघाचे अतोनात नुकसान झाले असून काल बुधवारी दुपारी चार वाजता लोहा-कंधार मतदार संघातील हजारो, महिला, पुरुष व चाहत्यांच्या उपस्थितीत रावसाहेब पाटील शिंदे यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला .यावेळी लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे ,माजी मंत्री विनायकराव पाटील,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,माजी आमदार रोहिदास चव्हाण,सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे, युवा नेते विक्रांत पाटील शामसुंदर शिंदे,जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर ,श्रीनिवास पा. चव्हाण नायगावकर, युवा नेते राहुल भैया हंबर्डे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर ,जिल्हा परिषद सदस्य मीनल ताई खतगावकर ,जिल्हा परिषद सदस्य हंसराज बोरगावकर ,मारोतराव कवळे गुरुजी, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील ,लोहा पंचायत समितीचे माजी सभापती सतीश पाटील उमरेकर, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती श्याम आण्णा पवार , पंचायत समिती सदस्य श्रीनिवास देशमुख ,पंचायत जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल मोरे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भास्करराव पाटील जोमेगावकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बालाजी पाटील मारतळेकर, लोहा पंचायत समिती सभापती आनंदराव शिंदे, माधव पाटील, भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य केषवराव मुकदम, तहसीलदार व्यंकटेश मुंडे,लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे ,भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रवीण साले, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती शाम आण्णा पवार, सुधाकर सातपुते,सह लोहा-कंधार व नांदेड जिल्ह्यातील हजारो नागरिक,हितचिंतक,
सगेसोयरे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.