
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख अंबाजोगाई: येथील योगेश्वरी महाविद्यालयात महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, बीड, स्वा.रा.ती. महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय महाविद्यालयीन प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत बीड जिल्ह्यातील रेड रिबन क्लब (R R C) असलेल्या 8 महाविद्यालयीन संघांनी सहभाग नोंदविला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एच. आय. व्ही. एड्स व क्षयरोग याविषयी जनजागृती करण्याकरिता व एड्सच्या प्रतिबंधात्मक उपायांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, कार्यक्रमाधिकारी साधना गंगावणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा.एन.के. गोळेगावकर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असे प्रतिपादन केले की विद्यार्थ्यांनी समाजात एड्स विषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जिल्हा कार्यक्रमाधिकारी साधना गंगावणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आपल्या प्रास्ताविकात त्यांनी प्रश्न मंजुषा चे उद्दीष्ट, स्वरूप व अटी व नियमांच्या अटी याविषयी माहिती दिली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी.जोशी.,उपप्राचार्य डॉ. आर. व्ही. कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुशीला हलगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा पर्यवेक्षक सुहास कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना एड्स विषयी समज/गैरसमज, प्रतिबंधात्मक उपाय व उपचार याविषयी माहिती दिली. या प्रश्न मंजुषा स्पर्धेचे परीक्षण साधना गंगावणे, सुहास कुलकर्णी व उपप्राचार्य डॉ. आर. व्ही. कुलकर्णी यांनी केले. त्याचबरोबर, यानिमित्ताने जिल्हास्तरीय एड्स, टीबी, रक्तदान जनजागृती यावर पोस्टर्स स्पर्धेचे उद्घाटन व परीक्षण करण्यात आले. तसेच महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी एच.आय.एड्स. तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले. यासही विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी १०४ विद्यार्थ्यांची एच.आय.व्ही. तपासणी करण्यात आली. एच.आय.व्ही. तपासणी तंत्रज्ञ विश्वास लवंदे व एच.आय.व्ही समुपदेशक श्री.धनराज पवार यांनी केली.कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सदरील जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे प्रथम क्रमांक योगेश्वरी महाविद्यालयाच्या पंकजा किरवले व प्रियंका शिंदे यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक खोलेश्वर महाविद्यालयातील गणेश लोकरे व औसेकर पद्मनाभ यांनी मिळवला. तृतीय क्रमांक सिध्देश्वर महाविद्यालय,माजलगाव येथील नेहा शेख व रमा घनघव यांनी मिळविला. प्रथम क्रमांकास ५०००/, द्वितीय क्रमांकास २०००/, तृतीय क्रमांकास १०००/ रू. तसेच प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच यावेळी पोस्टर्स स्पर्धेचेही बक्षीस वितरण करण्यात आले. पोस्टर्स स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. पंकजा किरवले, द्वितीय क्रमांक कू. प्रियंका शिंदे व तृतीय क्रमांक रुपाली शिंदे यांनी मिळविला. या स्पर्धेचे सूत्रसंचालन रेड रिबन क्लब समन्वयक प्रा.डॉ. अनिल नरसिंगे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रमाधिकारी साधना गंगावणे यांनी केले. आभार प्रदर्शन एच.आय.व्ही. समुपदेशक श्री धनराज पवार यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. कोव्हीड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन रेड रिबन क्लब समन्वयक प्रा.डॉ. अनिल नरसिंगे, जिल्हा कार्यक्रमाधिकारी साधना गंगावणे व एच.आय.व्ही. समुपदेशक श्री धनराज पवार यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. जोशी यांच्या मार्गर्शनाखाली केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुकेशनी गंडले, प्रदीप जिरे, बापू लुंगेकर, राजकुमार गवळे, राजेश गोस्वामी, रेखा बनसोडे, अरुण ताटे व भीमा कांबळे यांनी केले.