दैनिक चालु वार्ता शहादा ,
प्रतिनिधी : क्रिष्णा गोणे
शहादा : ८/११/२०२१ रोजी घरातून रात्रीच्या ९ वाजेच्या सुमारास निघालेल्या नामक श्री. गणेश रविंद्र कोळी या २५ वर्षाचा तरुणाचा मृतदेह दिनांक ९/११/२०२१ रोजी झोतवाडे जवळील मंदाणे गावातील संत तुकाराम महाराज मंदीरजवळ आढळून आला असून मयत गणेश रविंद्र कोळी हा चोरीच्या संशयावरून मारून टाकण्यात आला . मयत गणेश कोळी याचा खुन झाला असून असे दाठ संशय आहे. मयत गणेश यास एक-दीड वर्षाचा मुलगा व एक दोन महीन्याचा मुलगा आहे. गणेश हा अत्यंत गरीब परिस्थितीतील असून घरातून तरून मुलगा अचानक हिरावून गेल्यामुळे घरातील लोकांना आघाळ कोसळले आहे. या गुढ मुत्यूची योग्य निपक्ष कोणत्याही दबावावर बळी न पड़ता योग्य ती चौकशी व्हावी. संशयीत आरोपींचे कसून चौकशी व त्यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी व मयत गणेश यांच्या कुटूंबाला न्याय मिळून द्यावा. असे शहादा तालुक्यातील अखिल भारतीय कोळी समाजबांधवांतर्फे
तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.