
कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तर्फे पाल
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी शहाबाज मुजावर
कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तर्फे पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत,आरोग्य राज्यमंत्री ना.राजेंद्र पाटील- यड्रावकर, आ.पी.एन. पाटील यांच्या उपस्थितीत दाखल केला. द्यावी माननीय बंटी पाटील बोलत असताना सांगितले की आम्ही महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात विकास काम केलेले आहेत त्यामुळे ही निवडणूक शंभर टक्के मी जिंकणार आज माझ्या बरोबर 250 नगरसेवक व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आहेत आणि दोन-तीन दिवसात हे मी 280 पर्यंत नेणार तसेच तुमच्या विरोधात कोण आहे असे विचारल्यानंतर त्याने सांगितले की अजून भाजप ने अधिकृत रित्या घोषित केल्या नसल्यामुळे मी त्यांच्याबद्दल आता तरी काय बोलू शकणार नाही, यावेळी मुश्रीफ साहेब बोलत असताना सांगितले कि आम्ही तीन पक्ष व आमच्या बरोबर अपक्ष एकत्र असल्यामुळे काहीच प्रश्न येत नाही विजय सत्यजित उर्फ बंटी पाटील यांचा निश्चित आहे ही काळया दगडावरची पांढरी रेष आहे आहे तसेच उदय सामंत यांनी मी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मी या ठिकाणी उपस्थित आहे तसेच माझ्याबरोबर सर्व शिवसेना नेते माजी आमदार आमदार सर्व शिवसैनिक उपस्थित आहेत आणि पाटील यांचा विजय निश्चित आहे,