
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
विकास कामे झाले नसून लाखोंचा निधी गहाळ
मालकातर ता.शिरपुर जिल्हा धुळे येथील ग्रामस्थांनी 5 वर्षात एकूण आलेला निधी किती व खर्च कुठे केला हे विचारणा केली असता ग्रामसेवकाने गावकर्यांना 16 तारखेला विशेष ग्रामसभेचे नियोजन करून हिशोब सादर करणार असल्याचे आस्वाशन दिले असता. आज 16 नोव्हेंबर रोजी ग्रामसेवक परदेशी यांनी ग्रामस्थांना आचार संहिता लागू झाली आहे असे सांगून वेळ मारून नेल्याचा प्रकार केल्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर होत ग्रामस्थांनी माहिती द्या असे सांगून ग्रामसभा वादळी स्वरूपात चांगलीच गाजली. त्यात कोणालाही न सांगता किंवा अजेंडा न देता मतदार वाचन होत होतें. व प्रोसिडिग रजिस्टर वर काही एक विषय न लिहिता कोरी जागा सोडून ग्रामस्थच्या सह्या, अंगठे घेतले आहेत. यामुळे ग्रामस्थांनी ग्रामसेवक परदेशी व प्रशासक राठोड यांना प्रश्नाची सरबती करुन सोडले. त्यात महिला उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्या सदस्ययांनी देखील 5 वर्षाचा निधी व कामे विचारले सह माहिती विचारली असता त्यांनी ती माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे . सदर ग्रामसेवकांनी मालकातर गावात जणू हुकूमशाही पद्धत लागू केल्याचे दिसून आले
जोपर्यंत ग्रामपंचायत मधील पूर्ण हिशोब सादर केला जात नाही आम्ही शांत बसणार नाही,अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
याकडे गटविकास अधिकारी लक्ष देतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.