
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
मागणी पूर्ण न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा
शहादा शहरातील अनेक भागातील प्रचंड प्रमाणात दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांनी शहादा मुख्याधिकारी यांना निवेदन दिले
निवेदनाचा आशय असा की, शहादा शहरातील अनेक भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा सह किरकोळ अपघात हे रोजचे झाले आहे. त्यात काशिनाथ मार्केट ते एच डी एफ सी बँकेचा रस्ता, शिवाजी नगर ते शिरूड चौफुलीचा जुना प्रकाशा रोड, खेतिया रस्ता, प्रेस मारुती मंदिर परिसरातील रस्ता, व शहरातील इतर मुख्य रस्त्यांची पूर्णपणे वाताहत झाल्याने नागरिकांना वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यावर प्रशासन व सत्ताधारी मुग गिळून गप्प बसले आहे. किरकोळ अपघात तर हे रोजचे झाले आहे आता काय कोणाचा जीव जाण्याची वाट तर पाहत नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर प्रशासनाने आपल्या स्तरावरून दखल घेत सदर रस्ते दुरुस्त करावे. त्याच प्रमाणे शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यांचा बांधकामाचा दर्जाही निकृष्ट असल्याने योग्य ती चौकशी करून संबंधित ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. १५ दिवसाच्या आत काशिनाथ मार्केट ते एच डी एफ सी बँकेचा रस्ता, शिवाजी नगर ते शिरूड चौफुलीचा जुना प्रकाशा रोड, खेतिया रस्ता, प्रेस मारुती मंदिर परिसरातील रस्ता, व शहरातील इतर मुख्य रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
यावेळी मनसे चे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे, योगेश सोनार, दीपक लोहार, कौस्तुभ मोरे, दिनेश नेरपागर, सुहास पाटील, निलेश पाटील, गोपाळ कोळी, रविकांत सांजराज, कृष्णा कोळी, दीपक जव्हेरी, कल्पेश भोई आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.