दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली :
मध्य प्रदेशात दारुबंदीविरोधात उमा भारती यांनी आंदोलन छेडले आहे. त्या स्वपक्षाच्या सरकारविरोधात आंदोलन करत असल्याने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यावेळी जनतेसोबत संवाद साधत असताना त्यांना नोकरशाहांबद्दल एक वक्तव्य केलं. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. नोकरशाह म्हणजे आमची चप्पल उचलणारे असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ङ्कनोकरशाही म्हणजे काहीच नाही. ते आमची चप्पल उचलण्यासाठी आहेत. ते आमच्या चपला उचलतात. तुम्हाला काय वाटतं नोकरशाह नेत्याला फिरवतात तसं अजिबात नाही. आधी खासगीत चर्चा होते. नंतर फाईल बनवली जाते. आमच्या परवानगीशिवाय काही केले जात नाही. आम्हीच त्यांना पगार देतो, त्यांच्या पोस्टिंग ठरवतो, प्रमोशन डिमोशन करतो. त्यांना कोणताही अधिकार नाहीङ्क, असे वक्तव्य उमा भारती यांनी केले आहे.