
दै. चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी
आप्पासाहेब चव्हाण
अंबाजोगाई शहराच्या शैक्षणिक, सामाजीक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक परंपरा वृध्दींगत करतांना राजकिशोर मोदी यांचे नाव प्रथम घ्यावे लागेल. युवक चळवळीमधून नेतृत्व प्रक्रिया खऱ्या अर्थाने गतीमान करून आपल्या कार्याच्या माध्यमातून स्वत:ची ओळख निर्माण करणारे अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणजे राजकिशोर मोदी.
अंबाजोगाई शहराचा कायापालट करून महाराष्ट्राच्या नकाशावर अंबाजोगाई नगर परिषद नेऊन ठेवली ती राजकिशोर मोदी यांच्या विकसनशील कार्यशैलीमुळेच….. राजकारण,समाजकारण,धार्मिक परंपरा, शैक्षणिक परिवर्तन आदि वर्तुळाच्या सर्व भागांना स्पर्श करून सर्वांना आपलेसे वाटणारे नेतृत्वाचा आज जन्मदिन आहे.
नगर परिषदेच्या माध्यमातून अंबाजोगाई शहर हे एकात्मिक शहर योजना,गलिच्छ वस्ती सुधार योजना,दलित वस्ती सुधार योजना, तिर्थक्षेत्र विकास योजना, घरकुल योजना, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ यांच्या अंतर्गत असणारा निधी व लोकसहभाग यातुन शहरात बांधा-वापरा आणि हस्तांतरीत करा या योजनेतून शहरात अनेक दिमाखदार व भव्य वास्तू उभारलेल्या दिसतात. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान शहरात प्रभावीपणे राबवून राज्यात क्रमांक पटकावले न भूतो न भविष्यती असा अविस्मरणीय कार्यकाल मोदी यांच्याच अध्यक्षपदाचा राहिला
समाजात वावरतांना ८०% समाजकार्य व २०% राजकारण या प्रमाणे सामान्याच्या उन्नतीसाठी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून कार्यास सुरूवात केली. योगेश्वरी नागरी पतसंस्था व अंबाजोगाई पिपल्स बँक यांच्यामाध्यमातून अनेक छोटे मोठे व्यावसायिक, उद्योजक व सामान्य माणूस अर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला.
शहराचा पैसा शहराच्या विकासासाठीच कामी यावा या हेतूने सामान्यांच्या अर्थीक उन्नतीसाठी अंबाजोगाई पिपल्स बँक अनेक ठिकाणी उत्तमप्रकारे कार्यरत आहे. अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या माध्यमातून अंबाजोगाई शहराचे नाव महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात उमटवले. सामान्यांच्या हितासोबतच
अंबाजोगाई शहराचे शैक्षणिक परिवर्तनाचे चक्र गतीमान करण्याच्या हेतूने श्री. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाची सुरूवात मोदी यांनी केली. राजकिशोर मोदी यांच्या कल्पक व नियोजनबध्द कार्यशैलीमुळे श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून आज निवासी मतिमंद, मुकबधिर, बालसदन,अपंग शाळा तसेच जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक, घाटनागनाथ प्राथमिक, सी.बी.एस.ई. पॅटर्नचे न्यूव्हिजन पब्लिक स्कूल, औषध निर्माणशास्त्र विद्यालय, अध्यापक विद्यालय व महाविद्यालय, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, मूक बधिर व मतिमंद,शिक्षक प्रशिक्षण केंद्र, आदि शैक्षणिक सुविधा केंद्र उत्तम पध्दतीने अंबाजोगाई शहरात कार्यरत आहेत. बालाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक विकास हा योग्य नियोजन व उत्कृष्ठ व्यवस्थापन यांच्या द्वारे होत असल्याने त्यास कारणीभूत संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांची कार्यप्रणाली आहे. श्री बालाजी शिक्षण संस्थेची अद्यावत भव्य इमारत शहराच्या पुर्वेस दिमाखात उभी आहे..
सामाजिक क्षेत्रात काम करतांना प्रियदर्शनी क्रिडा मंडळाच्या माध्यमातून दिवाळी निमित्त रुग्णांना फराळ वाटप हा उपक्रम गेल्या काही वर्षापासून अव्याहतपणे चालू आहे. त्यासोबतच व्याख्यानमाला, कविसंमेलन, किर्तन महोत्सव, कष्टकऱ्यांचा सत्कार, विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव,शहरातील सर्वशाळांचे एकत्रित स्नेहसंमेलन म्हणजेच बाल झुंब्बड आदि उपक्रम अंबाजोगाई शहराच्या नकाशावर ठळकपणे उमटवले
शैक्षणिक, राजकीय, सामाजीक व सहकार क्षेत्रात काम करतांना कार्यकर्ता हा त्यांचा स्थायी स्वभाव असल्याने त्यांची आणि कार्यकर्त्यांची नाळ कधीही तुटली नाही नेता आणि कार्यकर्ता यातील फरक त्यांच्यात कधीही दिसून आला नाही. स्वत:मधील कार्यकर्ता सतत जागृत ठेवल्याने अनेक युवक मंडळी जोडली गेली. म्हणूनच सर्वसामान्यांना व सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाणारा कार्यकर्ता म्हूणन राजकिशोर मोदी यांची ओळख निर्माण झालेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यास कठीणप्रसंगी साथ देऊन आपले कर्तव्य पार पाडतात.कार्यकर्त्यांचा संच शैक्षणिक व विधायक दृष्टीकोन सामाजिक कार्याची झालर असल्यामुळे त्यांच्यावर सामान्यांपासून सर्वांनी प्रेम केले. शहराच्या कुटूंबातील एक सदस्य म्हणून त्यांची गणना होते. तीअंबाजोगाईकरांना ज्ञात आहे. राजकिशोर मोदी यांचे विलक्षण संघटन कौशल्यामुळेच ते अनेक जबाबदाऱ्या ते यशस्वीरित्या पार पाडीत आहेत.
प्रत्येक जबाबदारी अतिशय यशस्वीरित्या पार पाडल्याने मोदी यांची एक वेगळी छाप आहे त्यामुळेच कार्य करण्याची संधी प्राप्त झाली सत्ता असो अथवा नसो सर्वांसाठी तन-मन-धनाने कार्यकरणारे नेतृत्व म्हणून राजकिशोर मोदी यांची जनसामान्यात प्रतिमा आहे.
स्वतःची प्रबळ इच्छाशक्ती, कार्यकर्त्यांचे सहकार्य व वरिष्ठांचे मार्गदर्शन यांचा सुवर्णमध्यसाधून राजकिशोर मोदी यांच्या कार्याचा आलेख सतत चढता राहीला त्यांच्या प्रगतीची झेप अधिक उंचावत जावो व त्या उंचीच्या सावलीत सामान्यांना आधार मिळो हेच जन्म दिनाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन.
शब्दांकन: आप्पासाहेब चव्हाण