दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : लता मंगेशकर आणि दिलीप कुमार जवळपास १३ वर्षे एकमेकांशी बोलले नव्हते आणि हा अबोला सुमारे १९७० पर्यंत चालू राहिला होता. मीडिया रिपोर्टनुसार, संगीतकर सलील चौधरी यांनी ‘मुसाफिर चित्रपटातील ‘लागी नही छूटे हे गाणे गाण्यासाठी दिलीप कुमार यांची निवड केली. मात्र, लता मंगेशकर यांना माहित नव्हते की, दिलीप कुमार त्यांच्यासोबत एक गाणे गाणार आहेत. तेव्हा दोघांमधील हे मतभेद सुरू झाले. दिलीप कुमार हे बॉलिवूडचे असे अभिनेते होते, ज्यांना चित्रपट जगतात ट्रॅजेडी किंग म्हणूनही ओळखले जाते.‘ज्वारभाटा यां चित्रपटाने आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या दिलीप कुमार यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अभिनेते दिलीप कुमार आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे खूप खास नाते होते. वास्तविक दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना आपली लहान बहीण मानले होते. लता मंगेशकर देखील दिलीप कुमार यांना राखी बांधायच्या. पण या नात्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा या दोघांनी एकमेकांशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते.दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांच्यात मतभेद सुरु झाले होते. दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांच्यातील संभाषण बंद झाले, जेव्हा दिलीप कुमार यांनी लता मंगेशकरांना पाहून मराठी भाषिक लोकांसाठी उर्दू म्हणजे डाळ-भातासारखी आहे, अशी टिप्पणी केली होती. दिलीप कुमारांची ही गोष्ट लता मंगेशकरांना अशा प्रकारे जिव्हारी लागली की, त्यांनी दिलीप कुमार यांच्याशी बोलणेच बंद केले नाही, तर उर्दू शिकण्याचा निर्णय देखील घेतला होता.