
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी
बालाजी देशमुख
सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यात उभी पिके पाण्याखाली जाऊन आतोनात नुकसान झाले होते. दरम्यान, अतिवृष्टी भरपाईपोटी जिल्ह्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्राप्त झाली आहे. निधी बँकांना वर्ग देखील झालेला आहे. मात्र, तो खात्यात जमा करण्याची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू आहे. निधी तत्काळ अदा करा; अन्यथा कारवाई केली जाईल, अशी तंबी अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उप जिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी बँकांना दिली आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. भरपाईच्या मागणीने जोर धरल्यानंतर शासनाने विशेष पॅकेज जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्यातील ८ लाख ४८ हजार ३७ शेतकऱ्यांसाठी शासन निकषानुसार मदत प्राप्त झाली. हा निधी संबंधित तहसीलदारांमार्फत बँकांना वर्ग करण्यात आला. पण अजनहीशेतकऱ्यांच्या हातात दमडाही पडलेला नाही.
अतिवृष्टी भरपाई तत्काळ अदा करा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा संतोष राऊत यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना १७ रोजी लेखी पत्राद्वारे दिला आहे.